कॅनडा मध्ये एप्रिल महिना डॉ बाबासाहेब आंबेडकर, 'दलित इतिहास महिना' म्हणून घोषित

कॅनडाच्या ओंटारियो प्रांताच्या बर्लिंग्टनच्या महापौर मारियान मीड वार्ड यांनी एप्रिल हा महिना "दलित इतिहास महिना" म्हणून अधिकृतपणे घोषित केला आहे. या पदनामाचा उद्देश डॉ. भीमराव आंबेडकर आणि ज्योतिराव फुले या महामानव यांच्या जगभरातील केलेल्या अतुलनीय योगदानाचे स्मरणार्थ त्यांच्या जयंती निम्मित घोषित करण्यात आलेला आहे. वंचित समाजासाठी एप्रिलचे महत्त्व ओळखून महापौर मीड वॉर्ड यांनी 20 मार्च रोजी एक घोषणा जारी केली. घोषणेमध्ये जातीवर आधारित भेदभावाविरुद्धच्या लढ्यात बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर आणि ज्योतिराव फुले यांच्या योगदानाचे स्मरण आणि उत्सव साजरा करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. " बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर आणि ज्योतिराव फुले यांसारख्या जातीवर आधारित भेदभावाविरुद्धच्या चळवळीतील प्रमुख दलित नेत्यांच्या आणि समाजसुधारकांच्या जयंती आणि पुण्यतिथींचा समावेश असलेला एप्रिल महिना दलित समुदायांसाठी महत्त्वाचा आहे. म्हणून मी , मारियान मीड वार्ड. , बर्लिंग्टन शहराचे महापौर , याद्वारे एप्रिल 2024 हा बर्लिंग्टन शहरात ' दलित इतिहास महिना ' म्हणून घ...